धुळे- जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेले सातजण फरार झाले आहेत. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. हे सातही जण रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत या सर्वांनी रुग्णालयातून पळ काढला आहे. या घटनेमुळे पोलीस तसेच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
विलगीकरण कक्षातील 7 जण फरार, धुळे जिल्हा रुग्णालयातील प्रकार - धुळे जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेले सातजण फरार झाले आहेत. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. हे सातही जण रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत या सर्वांनी रुग्णालयातून पळ काढला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धुळे येथील हिरे सर्वोपचार महाविद्यालयात टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी धुळे जळगाव नंदुरबार येथील कोरोना संशयित रुग्णांची तपासणी केली जाते. रविवारी या ठिकाणी दाखल झालेले सातजण सोमवारी पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्वांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते.
रुग्णालयात असलेल्या गर्दीचा फायदा घेत सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत या सर्वांनी रुग्णालयातून पळ काढला. आता या सातही जणांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.