धुळे - शहरालगत असलेल्या बाळापूर फागणे गावाजवळ ट्रॅक आणि स्कॉर्पिओ यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरत-नागपूर महामार्गावर हा इपघात झाला असून महामार्गावर असलेला पूर अत्यंत जुना व कमकुवत झाल्याने अपघाताचे केंद्र बनला आहे.
जळगावहून धुळ्याकडे येणारी स्कॉर्पिओ आणि जळगावकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यामुळे ही दोन्ही वाहने पुलावरून 50 फूट खाली कोसळली. यात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. स्कॉर्पिओमधील 2 जण जागीच ठार झाले.