धुळे- ट्रकने धडक दिल्याने शालेय विद्यार्थिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साक्री रोडवरील सिंचन भवनजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अपघातानंतर नागरिकांनी महामार्गावर प्रचंड गर्दी केली होती.
धुळ्यात ट्रकच्या धडकेत शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू - sinchan bhawan
गुंजन देविदास पाटील (१४) असे मृत मुलीचे नाव आहे. ती कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी असून नव्वीत शिकत होती. तिला ट्रकने जबर धडक दिल्याने तिचा मुत्यू झाला.
मृत गुंजन देविदास पाटील
गुंजन देविदास पाटील (१४) असे मृत मुलीचे नाव आहे. ती कमलाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी असून नववीत शिकत होती. (जी.जे ०१ सी.वाय २६७) क्रमांकाचा ट्रक अहमदाबादहून मलकापूरकडे जात होता. ट्रक धुळ्यातून मार्गस्थ होत असताना हा अपघात झाला. घटनेनंतर परिसरात गर्दी जमा झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रकचालक स्वत:हून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, गुंजनची शाळा दुपारची असल्याने सकाळी ती क्लासला जात असल्याचे सांगण्यात आले.