महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे प्रांताधिकारी कार्यालयावर सत्यशोधक शेतकरी सभेचा मोर्चा - satyashodhak shetkari sabha marched on Dhule

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच दुष्काळ निधी मिळावा, सर्व पिकांचा पीक विमा उतरविण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती मोर्चेकरांनी दिली.

धुळ्यात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

By

Published : Sep 14, 2019, 9:00 PM IST

धुळे -शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने आज (शनिवारी) धुळे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड किशोर ढवले यांनी केले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची माहिती देताना कॉम्रेड किशोर ढवळे

हेही वाचा -VIDEO : पांढरा ध्वज फडकावत पाकिस्तान सैन्याने जवानांचे मृतदेह नेले माघारी

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच दुष्काळ निधी मिळावा, सर्व पिकांचा पीक विमा उतरविण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती मोर्चेकरांनी दिली. या मोर्चाला शहरातील संतोषी माता चौक येथून प्रारंभ झाल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन आंदोलकांनी आपल्या मागण्यांबाबत घोषणा दिल्या. या मोर्चाबाबत पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वसुचना देण्यात आली नसल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. मोर्चाबाबत माहिती मिळताच पोलीस प्रशासनाच्यावतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, आपल्या मागण्यांबाबत सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी भिमराज दराडे यांच्याशी चर्चा केली. मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने घेतला होता.

हेही वाचा -कर्जासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन; तब्बल ४ महिन्यांपासून शेतकऱ्यांची कुचेष्टा

काय आहेत मागण्या-

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम 1996 योग्य अंमलबजावणी करावी, आदिवासींचे हक्क संपविण्याचे प्रस्तावित विधेयक 2019 तात्काळ रद्द करावे, शासन निर्णयानुसार राहून गेलेले दावे दाखल करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच दुष्काळ निधी त्वरित मिळावा, सर्व पिकांचा पिक विमा उतरवावा, त्वरित विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे 10 आदिवासींवर हल्ला करुन खून करणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details