धुळे - जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. मात्र, दिवसरात्र पाहारा देणाऱ्या पोलिसांसाठी एका अवलियाने 'सॅनिटायझर व्हॅन'ची निर्मिती केली आहे.
धुळ्यात पोलिसांसाठी 'सॅनिटायझर व्हॅन'ची निर्मिती
जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. मात्र, दिवसरात्र पहारा देणाऱ्या पोलिसांसाठी एका अवलियाने 'सॅनिटायझर व्हॅन'ची निर्मिती केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन पुकारण्यात आले. यानंतर सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. यासाठी पोलीस प्रशासन सतत पहारा ठेऊन आहे. २४ तास पोलीस कर्तव्य बजावत आहेत. अशावेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका व्यक्तीने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने सॅनिटायझर व्हॅनची निर्मिती करून पोलिसांच्या आरोग्याची चिंता मिटवली आहे.
कोरोनापासून पोलिसांचे संरक्षण होण्यासाठी या व्हॅनमध्ये सॅनिटायझरचे फवारे बसवण्यात आले आहेत. त्यामार्फत ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फवारे मारण्यात येत आहेत.