महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विमानतळाबरोबरच शहरालाही संभाजी महाराजांचे नाव द्या - संभाजीराजे भोसले

खासदार संभाजीराजे भोसले हे धुळे शहरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Sambhajiraje Bhosale
संभाजीराजे भोसले

By

Published : Mar 7, 2020, 7:31 PM IST

धुळे- फक्त विमानतळाचे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' करून चालणार नाही. तर औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, आम्ही त्याचे स्वागत करू, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. तसेच इतिहासाची मोडतोड न करता चित्रपट किंवा मालिका दाखवण्यात याव्या, अशीही मागणी खासदार भोसले यांनी केली आहे.

खासदार संभाजीराजे भोसले हे धुळे शहरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संभाजीराजे भोसले, खासदार

हेही वाचा -अपसंपदा प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची आमदारांची मागणी, धुळे महापालिकेत खळबळ

यावेळी खासदार भोसले यांनी धुळे शहरातील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाला भेट दिली. यावेळी संशोधन मंडळातील ऐतिहासिक वस्तू तसेच दस्तऐवज यांची भोसले यांनी पाहणी केली.

यावेळी भोसले म्हणाले, वि. का. राजवाडे संशोधन मंडळाला शासनाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. तसेच राज्य सरकारने औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, आम्ही त्याचे स्वागत करू, असे भोसले म्हणाले.

हेही वाचा -राज्यातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहांचे सोशल ऑडिट करा - चित्रा वाघ

ABOUT THE AUTHOR

...view details