धुळे -जिल्ह्यामध्ये नॉन कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी घेऊन समाजवादी पार्टीने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. यावेळी नगरसेवक आमीन पटेल आणि काही कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
समाजवादी पार्टीचे नगरसेवक आमीन पटेल यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - धुळे सपा नगरसेवक न्यूज
कोरोनामुळे बहुतांशी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्याच रुग्णांकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांचे हाल होत असल्याचे समोर आले. यासाठी समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
कोरोना काळामध्ये रुग्णालय प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने चांगले काम केला. त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुकही करतो. मात्र, या काळात नॉन कोविड रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नॉन कोविड कक्ष कार्यरत करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली.
आठवडाभरात धुळे जिल्हा प्रशासनाने नॉन कोविड रुग्णालय सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे नगरसेवक आमीन पटेल यांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला.