महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साक्रीतील अनेक गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सुकापूर, होळचापाडा, गांगुर्डेपाडा, देशमुखपाडा, वरदडी, ठाकरेपाडा, मांडवीपाडा यासह अन्य गावे १०० टक्के आदिवासी लोकसंख्येचे असूनही शासनाच्या नियमानुसार या गावातील ग्रामस्थांना अजूनही अनुसूचितक्षेत्राचा लाभ मिळत नाही.

By

Published : Apr 16, 2019, 9:53 AM IST

साक्रीतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

धुळे - जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विविध गावे ही १०० टक्के आदिवासी असून देखील या गावांचा पेसामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे येथील ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही तसेच येथील तरुणांना उच्चशिक्षण मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांनी येत्या सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याच निर्णय घेतला आहे.

साक्रीतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सुकापूर, होळचापाडा, गांगुर्डेपाडा, देशमुखपाडा, वरदडी, ठाकरेपाडा, मांडवीपाडा यासह अन्य गावे १०० टक्के आदिवासी लोकसंख्येचे असूनही शासनाच्या नियमानुसार या गावातील ग्रामस्थांना अजूनही अनुसूचितक्षेत्राचा लाभ मिळत नाही. यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शासनामार्फत जी भरती केली जाते त्या भरतीपासून योग्य शिक्षण असून देखील येथील तरुणांना वंचित राहावे लागत आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. साक्री तालुक्यातील या गावातील ग्रामस्थांना अनुसूचित क्षेत्राचा लाभ मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांनी आणि युवकांनी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सगळ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या गावाला अनुसूचितक्षेत्राचा लाभ मिळत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा येथील ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details