महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यातील सबा ऑटो सेंटरला आग; लाखोंचे नुकसान

सबा आटो सेंटरला अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीत दुकानात असलेल्या दुचाकी जळून खाक झाल्या.

saba auto center fire loss in millions in dhule
धुळ्यातील सबा ऑटो सेंटरला आग; लाखोंचे नुकसान

By

Published : Jan 23, 2021, 3:46 PM IST

Updated : Jan 23, 2021, 4:58 PM IST

धुळे -शहरातील वर्दळीच्या 80 फुटी रोडवर असलेल्या सबा आटो सेंटरला अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीत दुकानात असलेल्या दुचाकी जळून खाक झाल्या. आग लागलेल्या सबा आटो सेंटरच्या शेजारी असलेले नेहाल टायर दुकान व बाजूला असलेल्या एका घराचेही या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सबा ऑटो सेंटरला आग

आगीचे रौद्ररूप -

धुळे शहरातील सबा अ‌ॉटो सेंटरला रात्री अचानक आग लागली. आगीने बघताबघता रौद्ररूप धारण केले. सुमारे दीड तास चाललेल्या या आगीत मोठ्या प्रमाणावर मोटारसायकली जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सबा आटो सेंटरचे मालक यांनी म्हणणे आहे.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा -

80 फुटी रस्त्यावरील सभा आटो सेंटरला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोन केला असता, सव्वा ते दीड तासानंतर अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. या अग्निशामक बंबचा पाईप लिकेज असल्यामुळे पाणी उशिरा पोचल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ता यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेने पुन्हा एकदा महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार पुढे आला आहे. यामुळे अधिकाऱ्यांवर निष्काळजी पणाचा ठपका ठेवला जात आहे.

हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे जयंती: अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी

Last Updated : Jan 23, 2021, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details