महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यामध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या कार्यकर्त्याकडून पैसे जप्त केल्याची अफवा - seizing

धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची अफवा पसरली होती. याच घटनेची लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येलादेखील पुनरावृत्ती झाली.

धुळ्यामध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला पैसे जप्त केल्याची अफवा

By

Published : Apr 28, 2019, 9:53 PM IST

Updated : Apr 28, 2019, 11:58 PM IST

धुळे- धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची अफवा पसरली होती. याच घटनेची लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येलादेखील पुनरावृत्ती झाली. शहराजवळील एका हॉटेलमध्ये काहीजण संशयास्पद आढळून आले. मात्र, त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे काहीही आढळून आले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धुळे शहराजवळील महामार्गावर हॉटेल गौरव आहे. या हॉटेलमध्ये बाहेरगावाहून काही लोक आले असल्याची माहिती निवडणुकीच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना ४ जण त्याठिकाणी आढळून आले. या लोकांची चौकशी केली असता लग्नासाठी धुळ्यात आले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील सामानाची झडती घेतली असता त्यामध्ये मद्याच्या काही बॉटल आढळून आल्या. तसेच भाजपची एक डायरीदेखील मिळाली आहे. यामधील काहीजण भाजपचे असल्याची माहिती त्यांनी दिली.

या संपूर्ण चौकशीत आक्षेपार्ह, असे काहीही आढळून आले नाही. तरी या घटनेमुळे शहरात भाजपच्या काही लोकांना पैसे वाटत असतांना पकडल्याची चर्चा पसरली होती. तसेच पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून २५ लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची अफवादेखील यावेळी पसरली होती. त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, धुळे महापालिकेने निवडणुकीच्या वेळी अनिल गोटे यांच्या काही कार्यकर्त्यांनी पारोळा येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची गाडी फोडल्याची घटना घडली होती. या घटनेतील भाजपचा हाच पदाधिकारी यावेळी मोहाडी पोलीस ठाण्यात आढळून आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच हे प्रकरण भाजपच्या वरिष्ठांकडून पोलिसांवर दबाव आणून दाबल्याची देखील चर्चा सुरू आहे.

Last Updated : Apr 28, 2019, 11:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details