महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे लुटमार प्रकरण : दोन वर्षांनंतर आरोपींना ७ वर्षाचा सश्रम कारावास - Seven years rigorous imprisonment to the accused

वाहनचालक शरद भिला हेमाडे यांनी आझाद नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून टाल्या उर्फ राहुल गजानन थोरात, मयूर सुरेश कंडारे, सागर चिंतामण भोई, महेश प्रकाश पवार व संतोष चंद्रकांत शिंदे या संशयितांनी रस्त्यावर अडवत चाकूचा धाक दाखवून आपणास मारहाण करत २५ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच वाहनातील सहचालक समाधान पाटील यास मारहाण करत त्याच्याकडील दोनशे रुपये हिसकावत असताना नोट फाटल्याने अर्धा तुकडा घेत संशयित पसार झाल्याचे सांगितले.

सरकारी वकील अॅड निलेश कलाल सदर प्रकरणाची माहिती देताना

By

Published : Aug 30, 2019, 10:03 PM IST

धुळे - शहरालगत असलेल्या वरखेडी उड्डाणपुलाजवळ वाहन चालकास अडवत मारहाण केल्यानंतर चाकूचा धाक दाखवत २५ हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात ३० डिसेंबर २०१६ ला ५ संशयितांविरोधात लुटमारीसह धमकावत मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांच्याकडे असल्याने त्यांनी सखोल तपास करत संशयितांना जेरबंद केले आणि त्यांची ओळख पटवत न्यायालयात उभे केले.

सरकारी वकील अॅड निलेश कलाल सदर प्रकरणाची माहिती देताना

याप्रकरणी सरकारी वकील अॅड. निलेश कलाल यांनी जोरदार युक्तिवाद करत सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायाधीश उगले यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि यातील पाचही संशयितांना दोषी ठरवत त्यांना सात वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास पुन्हा एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

याप्रकरणी वाहनचालक शरद भिला हेमाडे यांनी आझाद नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून टाल्या उर्फ राहुल गजानन थोरात, मयूर सुरेश कंडारे, सागर चिंतामण भोई, महेश प्रकाश पवार व संतोष चंद्रकांत शिंदे या संशयितांनी रस्त्यावर अडवत चाकूचा धाक दाखवून आपणास मारहाण करत २५ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच वाहनातील सहचालक समाधान पाटील यास मारहाण करत त्याच्याकडील दोनशे रुपये हिसकावत असताना नोट फाटल्याने अर्धा तुकडा घेत संशयित पसार झाल्याचे सांगितले.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांच्याकडे सोपवण्यात आला. उगले यांनी प्रकरणाचा सखोल तपास करत यातील पाचही संशयितांना शिताफीने अटक करत फिर्यादी व साक्षीदारासमोर नेत गुन्ह्यात सहभाग असल्याबाबत खात्री केली. तसेच न्यायालयात आवश्यक व महत्वपूर्ण बाबी सादर केल्या.

खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यावर असल्याने गुरुवार दि २९ रोजी न्यायाधीश उगले यांच्यासमोर कामकाज झाले. यावेळी बचाव पक्षाचे वकील व सरकारी वकील अॅड निलेश कलाल यांनी जोरदार युक्तिवाद करत आपली बाजू मांडली. न्यायाधीश उगले यांनी दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेत यात सक्षम पुरावे व साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरत पाचही संशयित दोषी असल्याचा निर्वाळा देत पाच वर्षाची सक्त मजुरी व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास पुन्हा १ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला टाल्यास वाढीव शिक्षा -

पोलिस दप्तरी गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला टाल्या उर्फ राहुल थोरात याची गुन्हेगारीवृत्ती वाढत होती. यामुळे तत्कालीन पोलिस अधीक्षक यांनी त्यास जिल्ह्यातून काही काळ हद्दपार देखील केले होते. मात्र, नियमांचे उल्लंघन करत तो शहारत फिरत असल्याने पोलिसांनी त्यास अटकाव करत कारवाई केली होती. तर काही घटनांमध्ये संशयित म्हणून देखील त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. दरोडा, लूटमार, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर युक्तिवाद केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत त्याच्या विरोधात मुंबई पो. अॅक्ट १४२ नुसार आणखी १ वर्षाची वाढीव शिक्षा सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details