धुळे - कोरोनाच्या जागतिक महामारी विरोधात लढा देणार्या आरोग्य तसेच पोलीस प्रशासनाला कोरोना फायटर्स असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधले होते. देशभरातील आरोग्य आणि पोलीस तसेच सैन्य दलातील सेवानिवृत्तांना या कोरोना फायटर्सला सहकार्य करण्यासाठी त्यांच्यासोबत उभे रहाण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला शिरपूरमधील 45 ते 50 सेवानिवृत्त जवानांनी प्रतिसाद दिला आहे.
शिरपूरमधील सेवानिवृत्त झालेले सैनिकही कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी - कोरोना
45 ते 50 सेवानिवृत्त जवानांनी शिरपूर पोलिसांत स्वतःहून संपर्क साधला आणि कोरोना फायटर्स म्हणून पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या जवांनानी कोरोनाच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी 45 ते 50 सेवानिवृत्त जवानांनी शिरपूर पोलिसांत स्वतःहून संपर्क साधला आणि कोरोना फायटर्स म्हणून पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी या सर्व इच्छुकांची आवश्यक ती माहिती घेतली. तर पाहाणीसाठी म्हणून शिरपूरमध्ये आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनीही स्वेच्छेने सहकार्यासाठी पुढे आलेल्या या सेवानिवृत्त जवानांची माहिती जाणून घेतली. यातील काहींजण अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा पोलीस दलाला होईल, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केले आहे