महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#कोरोना इफेक्ट : दोनशे वर्षांत पहिल्यांदाच बेटावद येथील ध्वजयात्रा रद्द - ध्वज यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी आहे. तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा बेटावद येथील रेणुका देवीची ध्वज यात्रा रद्द करण्याच्या निर्णय ट्रस्टच्या वतीने घेतण्यात आले. पसत चैत्र पौर्णिमेचा उत्सवही साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.

रेणुका देवी
रेणुका देवी

By

Published : Apr 5, 2020, 10:50 AM IST

धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील रेणुका देवीची ध्वज यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. या यात्रा उत्सवाला दोनशे वर्षांची परंपरा लाभली आहे.

माहिती देतना पुजारी

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथून दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री सप्तशृंगी गडावर ध्वजयात्रा काढली जाते. बेटावद येथून नेण्यात आलेला ध्वज श्री सप्तशृंगी देवीच्या कळसावर लावण्याची प्रथा आहे. गेल्या दोनशे वर्षांची परंपरा या यात्रोत्सवाला असून हा ध्वज बेटावद ते वणी येथील सप्तशृंगी गडापर्यंत पायी नेला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मागील दोनशे वर्षांत प्रथमच यात्रा रद्द होत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेटावद येथे श्री रेणुका देवीचे प्राचीन मंदिर असून हा ध्वज नेण्याची परंपरा बुवा कुटुंबीयांकडे आहे. यंदा बेटावद येथे चैत्र पौर्णिमेचा उत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे.

हेही वाचा -लॉकडाऊन : 'सोशल डिस्टन्सिंग'चा धुळ्यात भाजपकडून फज्जा

ABOUT THE AUTHOR

...view details