महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे स्फोट प्रकरण; कारखाना बेकायदेशीर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप - reaction of people

स्फोट झालेला कारखाना नेमका कोणाचा होता? तिथे काय तयार केले जात होते? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.

कारखाना बेकायदेशीर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

By

Published : Aug 31, 2019, 9:36 PM IST

Updated : Sep 1, 2019, 12:11 AM IST

धुळे - शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील एका रसायन कारखान्यात आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास 2 बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून 65 पेक्षा अधीक लोक जखमी झाले आहेत. मात्र, या कारखान्यासंदर्भात अनेक बाबी समोर येत असून नागरिकांमध्ये रोष पसरत आहे.

कारखाना बेकायदेशीर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

हेही वाचा - अचानक स्फोट झाला, होरपळलेल्या लोकांना पाहून बेशुद्ध झालो; धुळ्यातील प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

आज शनिवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर वाघाडी येथील रसायन कारख्यानवर सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, हा कारखाना आहे कशाचा? यात नेमके काय काम केले जात होते? आणि हा कारखाना कोणाच्या मालकीचा आहे? या संदर्भात कोणतीही माहिती नाही. दरम्यान, अशा बेकादेशीर चालवल्या जाणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

हेही वाचा -धुळे स्फोट प्रकरण; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Last Updated : Sep 1, 2019, 12:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details