धुळे - शहरातील आदर्श सर्पमित्र ग्रुपच्या सदस्यांना पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ साप सापडला आहे. या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार, अशी माहिती आदर्श सर्पमित्र ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय मोरे यांनी दिली.
धुळ्यात आढळला पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ नाग; सर्पमित्र सोडणार निसर्गाच्या सान्निध्यात
पावसाळ्याला सुरुवात होताच दुर्मीळ जातीचे विविध प्राणी आणि पक्षी मानवी वस्तीत आढळून येत असतात. याचप्रकारे शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा गावाजवळ असलेल्या निमगुळ येथे एक दुर्मीळ जातीचा नाग असल्याची माहिती ग्रामस्थांनी आदर्श सर्पमित्र ग्रुपला दिली होती.
पावसाळ्याला सुरुवात होताच दुर्मीळ जातीचे विविध प्राणी आणि पक्षी मानवी वस्तीत आढळतात. याचप्रकारे शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा गावाजवळ असलेल्या निमगुळ येथे एक दुर्मीळ जातीचा नाग असल्याची माहिती ग्रामस्थांनी आदर्श सर्पमित्र ग्रुपला दिली होती. यानुसार सदस्य सचिन बागल आणि सौरभ बागल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी त्यांना पांढऱ्या रंगाचा नाग आढळला. हा नाग अत्यंत दुर्मीळ जातीचा आहे. यानंतर त्याला सर्पमित्र ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय मोरे यांच्या स्वाधीन करण्यात आले.
तर यासंबंधित चौकशी करून त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील. यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येईल, अशी माहिती दत्तात्रय मोरे यांनी दिली.