धुळे- शहरातील तब्बल १५० वर्षांची परंपरा लाभलेले प्राचीन असे पट्टाभिषिक्त श्री.राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी रामनवमी निमित्त मंदिरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने राम जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गेल्या १५० वर्षात अत्यंत साध्या पद्धतीने रामजन्म उत्सव साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
धुळ्यातील पट्टाभिषिक्त श्री.राम मंदिरात साध्या पद्धतीने रामनवमी साजरी - simple ram navami dhule
दरवर्षी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्याने कोणतीही सजावट करण्यात आली नाही. मदिरात अत्यंत साध्या पद्धतीने रामनवमी साजरी करण्यात आली.
राम नवमीनिमित्त रामजन्मोत्सव साजरा करून चैत्र नवरात्रोत्सवाची सांगता केली जाते. या काळात विविध मंदिरांमध्ये ९ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहरातील आग्रा रोड भागात असलेल्या राम मंदिरात चैत्र नवरात्री निमित्त किर्तन, प्रवचन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन केले जाते. दरवर्षी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्याने कोणतीही सजावट करण्यात आली नाही. मदिरात अत्यंत साध्या पद्धतीने राम नवमी साजरा करण्यात आली.
हेही वाचा-धुळ्याचे 'मरकझ' कनेक्शन; 15 जणांचे अहवाल प्रतिक्षेत