धुळ्यात संततधार सुरुच; बुराई प्रकल्पाच्या साठ्यात वाढ - rivers in dhule
धुळ्यात संततधार सुरू आहे. यामुळे नद्यांच्या साठ्यातही वाढ झाली आहे. बुराई प्रकल्पाच्या साठ्यात वाढला असून शेतकरी आणि नागरिकांंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
धुळ्यात पावसाची संततधार
धुळे- शहरासह जिल्ह्यात आज खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणेसह माळमाथा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे रोहिणी नदी व वाजदरे येथील बुराई नदी दुथडी भरून वाहत असल्याने बुराई प्रकल्पाच्या साठ्यातही वाढ होत आहे.