धुळे- जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हा पाऊस शेतीसाठी उत्तम असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे.
धुळे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच; मुसळधार पावसाची शक्यता - शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण
धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. साक्री, माळमाथा परिसरात आठवडाभरापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे घटबारी लघुप्रकल्प यंदा प्रथमच तुडूंब भरला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. साक्री, माळमाथा परिसरात आठवडाभरापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे घटबारी लघुप्रकल्प यंदा प्रथमच तुडूंब भरला आहे. त्यामुळे या खुडाणे आणि डोमकानी या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धुळे जिल्ह्यात दमदार पाऊस होत आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.