धुळे - साक्री तालुक्यातील म्हसदी येथील योगेश पवार खूनप्रकरणी संशयितांची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी एकलव्य मित्र मंडळ आणि भिल्ल समाजबांधवांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. योगेश पवार या तरुणाचा १२ जून २०१९ रोजी खून झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
धुळे : योगेश पवार खूनप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी
साक्री तालुक्यातील म्हसदी येथील योगेश पवार खूनप्रकरणी संशयितांची सीआयडी चौकशी करावी, या मागणीसाठी एकलव्य मित्र मंडळ आणि भिल्ल समाजबांधवांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. योगेश पवार या तरुणाचा १२ जून २०१९ रोजी खून झाला होता.
योगेश पवार या तरुणाची १२ जून २०१९ रोजी निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत फेकून देण्यात आला होता. या खुनानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या खुनातील मास्टर माईंड वसंत दौलत देवरे आणि त्याच्या २ साथीदारांनी संगनमताने कटकारस्थान रचून योगेशचा खून केला असल्याचे समाजबांधवांचे म्हणने आहे.
गावातील वसंत देवरे याच्या विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप त्याला आणि त्याच्या साथीदारांना अटक केलेली नाही. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.