महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात राष्ट्रवादी महिला आघाडीकडून बबनराव लोणीकरांचा वक्तव्याचा निषेध

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यातील एका कार्यक्रमा दरम्यान महिला अधिकाऱ्याला उद्देशून 'हिरोईन' या शब्दाचा वापर केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला.

लोणीकरांचा निषेध
लोणीकरांचा निषेध

By

Published : Feb 4, 2020, 6:54 PM IST

धुळे -माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने शिरपूर येथे निषेध करण्यात आला. महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारुन तो जाळला.

धुळ्यात लोणीकरांचा निषेध करण्यात आला


माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यातील एका कार्यक्रमा दरम्यान महिला अधिकाऱ्याला उद्देशून 'हिरोईन' या शब्दाचा वापर केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावरील लोकांचा रोष कमी झाला नाही.

हेही वाचा - माजी मंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली; महिला तहसीलदाराला म्हणाले...

बबनराव लोणीकर यांनी महिला अधिकाऱ्याचा अपमान केला. हा फक्त त्या अधिकाऱ्याचा अपमान नसून, सर्व महिलांचा अपमान आहे. लोणीकरांनी याबाबत सारवासारव न करता माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details