धुळे -जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या संख्येत 3 जणांची वाढ झाली आहे. एकूण कोरोनाबधितांची संख्या 137 झाली असून, आतापर्यंत 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही 50 टक्के असून, ही बाब धुळेकरांना दिलासा देणारी आहे.
दिलासादायक; कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण धुळे जिल्ह्यात 50 टक्के
धुळे जिल्हात नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.
धुळे कोरोना अपडेट
धुळे जिल्हात नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून, यामुळे अन्य तालुक्यातील धोका वाढला आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोनाबधितांमध्ये ४2 वर्षीय पुरुष आणि ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.