धुळे - भगवान गौतम बुद्ध यांची जयंती ही फक्त औपचारिकता म्हणून साजरी न करता त्यांच्या विचारांचे आचरण होणे गरजेचे आहे. 'आज देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे', असे मत प्रा. विलास चव्हाण यांनी व्यक्त केले.
'देशाला युद्धाची नाही तर बुद्ध विचारांची गरज आहे'
भगवान गौतम बुद्ध हे विज्ञानवादी दृष्टीकोन जोपासणारे होते. आजच्या तरुणांकडे पाहताना या तरुणांना खऱ्या अर्थाने बुद्ध विचार समजून घेण्याची गरज आहे.
भगवान गौतम बुद्ध यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रा. विलास चव्हाण म्हणाले, भगवान गौतम बुद्ध यांची जयंती ही फक्त औपचारिकता म्हणून साजरी केली जात आहे का? असा महत्त्वाचा प्रश्न आहे. देशातली युद्धजन्य परिस्थिती पाहता या देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. बुद्धांनी सांगितलेल्या सम्यक मार्गाने जीवनाची वाटचाल करणे गरजेचे आहे. भगवान गौतम बुद्ध हे विज्ञानवादी दृष्टीकोन जोपासणारे होते. आजच्या तरुणांकडे पाहताना या तरुणांना खऱ्या अर्थाने बुद्ध विचार समजून घेण्याची गरज आहे. बुद्ध विचारांचे पालन केले आणि शांतीच्या मार्गाने जीवनाची वाटचाल केली तर देशाचे भवितव्य उज्वल आहे.