धुळे- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा धुळे जिल्हा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या माध्यमातून याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
दहशतवादी हल्ल्याचा धुळ्यात शिवसेनेकडून निषेध - पुतळा
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा धुळे जिल्हा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला.
अब्दुल रशीद गाझी याचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना
या हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या अब्दुल रशीद गाझी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला रस्त्यावरून फरफटत नेत शहरातील आग्रा रोड भागात दहन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देत पाकिस्तानला लवकरात लवकर धडा शिकवावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.