महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tribal People Issues: रस्ता नसल्याने गरोदर महिलेला झोळीतून ६ किमी नेले! प्राथमिक सुविधा नसल्याने आदिवासींचे हाल - non availability of roads in tribal area in dhule

सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम भागात आदिवासींच्या नशिबी अजुनही विकास नाही. एका गरोदर महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याने तिला बांबूच्या झोळीत टाकून नातेवाईकांना सहा किलोमीटर पायपीट करत रुग्णालय गाठावे लागले आहे. शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथे रस्त्याची सुविधा नाही. थुवानपाणी येथील एका महिलेला चक्क बांबूंना फडके बांधून त्याची झोळी करुन तीन किलोमीटर अंतरावरील गुऱ्हाळपाणी येथे नेण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. या महिलेला आता गुऱ्हाळपाणी आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

Tribal People Issues
रस्ता झोळीत पार

By

Published : Jul 16, 2023, 2:31 PM IST

रस्ता नसल्याने महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांची तारेवरची कसरत

धुळे :शिरपूर तालुक्यात उत्तरेला मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवानपाणी ते निशाणपाणी या दुर्गम क्षेत्रात येण्याजाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात. येथील लालबाई मोतीराम पावरा या महिलेला प्रसूतीकळा होऊ लागल्या. त्यामुळे त्या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली. यावेळी नातेवाइकांनी बांबूची झोळी बनवून त्यात गरोदर महिलेला टाकून निशाणपाणी ते थुवाणपाणी व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी हे अंतर 3 किलोमीटरचे अंतर पायपीट करत आणण्यात आले.


झोळी करून महिलेला आणले दवाखान्यात :निशाणपाणी ते थुवाणपाणी आणि थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी डांबरी रस्ता नसल्याने येथे रुग्णवाहिका पोहोचत नाही. त्यामुळे या महिलेला निशाणपाणी ते थुवाणपाणी 3 किलोमीटर व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी 3 किलोमीटर असे एकूण 6 किलोमीटरचा रस्ता झोळीत पार करण्यात आला. त्यानंतर तेथून या महिलेला गुऱ्हाळपाणी येथून अंबुलन्सने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांची सुरक्षितरित्या डिलीव्हरी होऊन बाळ व त्या महिलेची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. तसेच याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गुलबा पावरा, सिकना पावरा, कावसिंग पावरा, आशा सेविका सुरमीबाई पावरा, सतीलाल पावरा यांनी या महिलेला झोळीने आणण्यास सहकार्य केले.


रस्त्याची सुविधा पुरवा :तीन ते चार महिन्यांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी या क्षेत्राला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देखील थुवाणपाणीपर्यंत पायी चालत यावे लागले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना रस्त्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही रस्त्याबाबत काही कारवाई न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे. या दुर्गम भागात रस्त्याची सुविधा पुरवावी, अशी मागणी होत आहे. गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत दहा ते बारा खेडे येतात. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासुन रस्त्याची मागणी करत आहोत. मात्र याबाबत कोणीही गांभीर्य घेतलेले नाही. या क्षेत्रात रस्त्याची सुविधा पुरविण्यात याव्यात, असे राजेंद्रसिंग पावरा यांनी म्हटले.


2020 मध्ये देखील अशीच घटना : 14 मे 2020 रोजी अश्याच प्रकारची घटना थुवाणपाणी येथे घडली होती. 15 मे 2020 रोजी ही घटना अनेक वृत्तपत्रांमध्ये छापल्यामुळे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी गुऱ्हाळपाणी येथे येऊन एका दिवसात एक डॉक्टर व नर्सची नियुक्ती करून हा प्रश्न सोडवला होता. परंतु त्या घटनेला 3 वर्षे ओलांडुन ही थुवानपाणी व निशाणपाणी येथे रस्त्याची सोय न झाल्यामुळे आज पुन्हा एका महिलेला झोळीत दवाखान्यात आणण्यात आले.

हेही वाचा :

  1. Youth Urinated in Ear : धक्कादायक! आदिवासी तरुणाच्या कानात केली लघुशंका; व्हिडिओ व्हायरल
  2. Tribal Youth Beaten : आदिवासींवर अत्याचार वाढला?, छत्तीसगडमध्ये आदिवासी तरुणाला जेसीबीला बांधून मारहाण
  3. Satara Crime : पतीला डांबून कोळसा कारखान्यातील आदिवासी महिलेवर 11 जणांचा सामूहिक बलात्कार, पीडितेच्या आरोपावरुन एकजण ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details