महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारा पोलीस कर्मचारी निलंबित - abvp workers beaten by police

अब्दुल सत्तार यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. सत्तार यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना दिले होते.

abvp worker beating issue
अभविप कार्यकर्ता मारहाण प्रकरण

By

Published : Aug 27, 2020, 6:54 PM IST

धुळे- जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस कर्मचारी सी.एच. पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

बुधवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवून आंदोलन केले होते. आंदोलनकर्त्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना बाजूला करताना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.मारहाण प्रकरणातील दोषी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी केली होती.

हेही वाचा-पालकमंत्र्यांचा ताफा अडवला; अभाविपच्या आंदोलकांना पोलिसांची मारहाण

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना दिले होते. अखेर या घटनेत मारहाण करणारे पोलीस कर्मचारी सी.एच.पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे धुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details