धुळे - ट्रकमध्ये चनादाळ व हार्डवेअरच्या गोण्यांच्या खाली विमल गुटखा, पान मसाला, प्रतिबंधित सुगंधित सुपारी आदींची वाहतूक करताना पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी 32 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धक्कादायक; ट्रकमध्ये चनादाळ, हार्डवेअरच्या गोण्यांखालून गुटख्याची तस्करी - update police action news in dhule
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवी पोलिसांनी शिताफीने ट्रकला थांबवून तपासणी केली. यावेळी चनादाळ व हार्डवेअरच्या गोण्याखाली विमल गुटखा, पान मसाला,प्रतिबंधित सुगंधित सुपारी आदी मुद्देमाल पोलिसांना मिळुन आला.
मध्यप्रदेश येथून धुळे महाराष्ट्राकडे जाणाऱ्या एम एच 18 एपी 1101 क्रमांकांच्या ट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवी पोलिसांनी शिताफीने ट्रकला थांबवून तपासणी केली.
यावेळी चनादाळ व हार्डवेअरच्या गोण्याखाली विमल गुटखा, पान मसाला,प्रतिबंधित सुगंधित सुपारी आदी मुद्देमाल पोलिसांना मिळुन आला. पोलिसांनी ट्रकसह 32 लाख 70 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत चालक श्याम मोहनलाल मोर्या ( रा. कनोद जि.देवास ) तसेच बलराम मानसिंग बशानिया ( रा.कनोद मध्यप्रदेश ) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारावाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, दीपक वारे, नरेंद्र खैरणार, लक्ष्मण गवळी, योगेश दाभाडे, योगेश मोरे, गोविंद कोळी आदींनी कारवाई केली आहे.