धुळे -अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेसंदर्भातील निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या संजय शर्मा यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे.
धुळे : रामजन्मभूमी संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेसंदर्भातील निकालाच्या पाश्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या संजय शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयोध्या येथील रामजन्मभूमीच्या जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी निकाल घोषित केला जाणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची सोशल मीडियावर देखील करडी नजर असणार आहे. शनिवारी रामजन्मभूमीचा निकाल घोषित होणार असल्याची वार्ता समजताच धुळे शहरातील संजय शर्मा यांनी फेसबुकवर रामजन्मभूमीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिवाळी साजरी करणार असल्याची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्ट मुळे कायदा-सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा उपाय म्हणून संजय शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हिंदुत्ववादी संघटनेचे राजू महाराज नामक कार्यकर्त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. रामजन्मभूमीचा निकाल घोषित झाल्यानंतर नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.