धुळे : शहरातील महाकाली मंदिराजवळ एका 35 वर्षीय व्यक्तीचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. यानंतर पोलिसांना माहिती मिळताच डीवायएसपी सचिन हिरे हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, ३ दिवस उलटूनदेखील मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही.
धुळे जितेंद्र मोरे हत्या प्रकरण : ३ दिवस उलटूनही मारेकरी फरार
धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथील एका कुरियर दुकानात काम करणाऱ्या जितेंद्र शिवाजी मोरेचा शनिवारी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेतलं आहे, मात्र त्यांच्याकडून देखील कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून लवकरच मारेकऱ्यांचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जितेंद्र शिवाजी मोरे हा धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथील एका कुरियर दुकानात काम करत होता. पत्नीला घेऊन येण्यासाठी तिच्या माहेरी जात असून तिकडेच दोन-तीन दिवस राहणार असल्याचे सांगून तो घरून निघाला होता. मात्र, तो सासुरवाडीला न जाता शहरातच होता. जितेंद्र कुरियर दुकानात कामाला होता. मात्र, शनिवारी सकाळी जितेंद्र मोरे याचा मृतदेह शहरातील महाकाली माता मंदिराजवळ आढळून आला. जितेंद्रचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, ३ दिवस उलटून देखील जितेंद्रच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेतलं आहे, मात्र त्यांच्याकडून देखील कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून लवकरच मारेकऱ्यांचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.