महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : शिरपूर शहराजवळ बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

तालुक्यातील अजंदे शिवारात बंद अवस्थेत असलेल्या पद्मावती कॉटन जिनिंग फॅक्टरीत एका गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधिकारी संताजी लाड व मनोज चव्हाण यांनी सायंकाळी छापा टाकला. घटनास्थळी स्पिरिटपासून अवैध देशी-विदेशी दारू बनविण्याची साधन सामुग्री आढळून आली.

दारू कारखाना
दारू कारखाना

By

Published : Jun 10, 2021, 7:50 PM IST

Updated : Jun 10, 2021, 8:19 PM IST

धुळे -राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील पथकाने अजंदे शिवारातील बंद पडलेल्या पद्मावती जिनिंग फॅक्टरीत बनावट दारुचा छोटा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कार्यवाहीत चार संशयितांसह एक कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

अशी झाली कारवाई

तालुक्यातील अजंदे शिवारात बंद अवस्थेत असलेल्या पद्मावती कॉटन जिनिंग फॅक्टरीत एका गोपनीय माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधिकारी संताजी लाड व मनोज चव्हाण यांनी सायंकाळी छापा टाकला. घटनास्थळी स्पिरिटपासून अवैध देशी-विदेशी दारू बनविण्याची साधन सामुग्री आढळून आली. त्यात २०० लिटर पूर्ण क्षमतेचे भरलेले ४६ बॅरल स्पिरीट व पॅकेजिंग मशीन, विविध ब्रँडच्या नावाने तयार बनावट दारू बाटलीचे खोके, विविध कंपनीच्या नावांची लेबल साठा आढळून आला. शिवाय वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी बोलेरो (एमएच १८ एम. २८६७ ) बनावट तयार दारू वाहतुकीसाठी विविध गाड्या असा एक कोटी किमतीपेक्षा जास्तीचे साहित्य मिळून आले आहे. या कारवाईत चार संशयितांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा -बीडच्या गेवराईत शेतीच्या वादातून दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

Last Updated : Jun 10, 2021, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details