महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्र्यांचा ताफा अडवला; अभाविपच्या आंदोलकांना पोलिसांची मारहाण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट नाकारल्याने आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकमंत्र्यांचा ताफा अडविला.

police action
अभाविपच्या आंदोलकांना अमानुष मारहाण

By

Published : Aug 26, 2020, 5:16 PM IST

धुळे - जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली होती. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे बुधवारी धुळे दौऱ्यावर आले होते.

यावेळी त्यांची भेट घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट नाकारल्याने आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकमंत्र्यांचा ताफा अडविला. यावेळी क्यूआरटी पथकाने आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करत अमानुषपणे मारहाण करत अटक केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details