धुळे - शिरपूरच्या एका तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ५० हजाराच्या दुचाकीसह ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय अभिषेक पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कर्नाटक पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यांना एका इसमाचा देशी बनावटीच्या पिस्तुलासह फोटो आढळला. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता मोबाईलमधील तरुण हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत एका गावात राहत असल्याचे समजले. ही माहिती कर्नाटक पोलिसांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना दिली. पंडित यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय अभिषेक पाटील यांना ही माहिती देत तपासाबाबत मार्गदर्शन केले.
कर्नाटक पोलिसांच्या माहितीवरून शिरपूरच्या तरुणाला देशी पिस्तुलासह अटक - Dhule letest update
कर्नाटक पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यांना एका इसमाचा देशी बनावटीच्या पिस्तुलासह फोटो आढळला. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता मोबाईलमधील तरुण हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत एका गावात राहत असल्याचे समजले. ही माहिती कर्नाटक पोलिसांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.
फोटोच्या आधारावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासात तो व्यक्ती अरुण रावजी पावरा (वय 19 रा, जोयदा, ता शिरपूर) हा असल्याचे निष्पन्न झाले. एपीआय अभिषेक पाटील यांनी आरोपी अरुण पावराला त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. दुचाकीची तपासणी केली असता पोलिसांना सीटखाली देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. त्याच्या मोबाईल फोनमध्ये देखील पिस्तूलचे फोटो आढळले. पोलिसांनी त्याच्याकडील 12 हजार रुपये किमतीचे पिस्तूल 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल 50 हजार रुपये किमतीची दुचाकी, दोन जिवंत काडतुसे असा 72 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
ठोस कारवाई करण्याची गरज
मध्यप्रदेश, गुजरात तसेच कर्नाटकच्या सीमेवरून धुळे जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रे आणली जातात. या राज्यांच्या सीमा नाक्यांवर कठोरपणे तपासणी होऊन याला आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, गेल्या सात ते आठ महिन्यात धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई मधून अनेक अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या अवैध शस्त्रांमुळे एखादी मोठी दुर्दैवी घटना घडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.