धुळे - प्लास्टिक बंदी होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात धुळे महापालिकेने शहरात ठिकठिकाणी कारवाई करून तब्बल ३ ते ४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील होलसेल वस्तू विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करून, प्लास्टिक पिशव्या वापरू नये, असे आवाहन करण्यात आल आहे.
प्लास्टिक बंदी: धुळे पालिकेने वर्षभरात केला ४ लाखांचा दंड वसूल
प्लॅस्टिक बंदी होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात धुळे महापालिकेने शहरात ठिकठिकाणी कारवाई करून तब्बल ३ ते ४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील होलसेल वस्तू विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात ३० जून रोजी राज्य सरकारच्या वतीने प्लॅस्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षभरात धुळे महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, बंदी असून देखील शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या वतीने ३ ते ४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जवळपास ८ टन प्लॅस्टिक जमा करण्यात आले आहे. मात्र, ज्या प्रकारे ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. त्यापद्धतीने कारवाई होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
शहरातील दूध विक्रेते अजूनही नागरिकांना प्लॅस्टिक पिशव्यांच्या माध्यमातून दूध देतात. त्यामुळे यापुढील कारवाई दूध विक्रेत्यांवर होणार असून, नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा असे आवाहन पालिकेचे आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी केले आहे.