धुळे- मध्य प्रदेशमधील ऊसतोड कामगार घेऊन येणारे पिकअप वाहन शिरूड पुलावरून खाली पडले. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ महिला, ५ लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळ्यात पुलावरून वाहन खाली कोसळले; 5 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू - dhule accident news
मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाने पाण्यात उतरून मृतदेहांसह जखमींना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघात
हेही वाचा -गर्भपात केलेले भ्रूण खाल्ले मांजरीने, अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे महापौरांचे आश्वासन
धुळे-सोलापूर मार्गावर बोरी नदीच्या पुलावर मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला. पुलावरून हे पिकअप थेट नदीपात्रात पडले. रुग्णवाहिकेच्या चालकाने पाण्यात उतरून मृतदेहांसह जखमींना बाहेर काढले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Last Updated : Nov 30, 2019, 11:32 AM IST