धुळे- दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, धुळे शहरातील पेट्रोल पंप चालकांना याचा विसर पडल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. यावेळी शहरातील पेट्रोल पंप सर्रासपणे सुरूच होते.
पेट्रोल पंपचालकांना पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना आदरांजली वाहण्याचा विसर - Dhule
दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २० मिनिटे पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, धुळे शहरातील पेट्रोल पंप चालकांना याचा विसर पडल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीफच्या ४९ जवानांना हौतात्म आले. या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध केला जात आहे. जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध संघटना आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. कँडल मार्च, मशाल रॅली या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. पाकिस्तानला धडा शिकविण्यात यावा, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.
या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी ७ वाजता पेट्रोलपंप बंद करून २० मिनिटे जवानांना आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालक संघटनेच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र, धुळे शहरातील पेट्रोल पंप चालकांना याचा विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण धुळे शहरातील पेट्रोल पंप सर्रासपणे सुरू होते. यावरून शहरातील पेट्रोल पंप चालक किती जागरूक आहेत, याचा प्रत्यय आला.