महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे धुळ्यात पक्षाला बळकटी मिळेल' - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची शिरपूर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत अमरीश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाबाबत स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

अमरीश पटेल

By

Published : Oct 9, 2019, 9:21 PM IST

धुळे -काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात भाजपला बळकटी मिळेल. तसेच शिरपूर मतदारसंघाचा विकास फक्त पटेल यांच्या मेहनतीमुळे झालेला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या.

'अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे धुळ्यात पक्षाला बळकटी मिळेल'

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची शिरपूर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत अमरीश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाबाबत स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, शिरपूरच्या विकासात अमरीश पटेल यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरपूरचा अधिक विकास होणार आहे. आजवर अमरीश पटेल यांनी काँग्रेसला खूप दिले. मात्र, काँग्रेसने अमरीश पटेल यांना काय दिले? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details