धुळे- प्रत्येक शतकात विषाणूंच्या संसर्गातून विविध देशांमध्ये साथीचा फैलाव होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. त्यात धुळे जिल्हादेखील विविध आजारांच्या तडाख्यात सापडला होता. याचे पुरावे विविध ग्रंथांमध्ये आढळून आले आहेत. स्पॅनिश फ्लू, कॉलराचा फेरा, प्लेग अशा माहामारीला धुळेकरांनी खंबीरपणे परतवून लावले आहे. यात अनेक नागरिकांना आपला बळी द्यावा लागला आहे. आताही कोरोनामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. मात्र नागरिक कोरोनाविरोधात खंबीरपणे लढा देत आहेत.
स्पॅनिश फ्लू, कॉलराचा फेरा, प्लेग अन् आता कोरोना; खंबीर धुळेकरांनी 'अशी' केली साथरोगांवर मात, आता . . . . - Lockdown
धुळ्यात स्पॅनिश फ्लू, कॉलराचा फेरा, प्लेग अशा विविध साथरोगांचा फैलाव झाला होता. या साथरोगात विविध नागरिकांचा बळी गोला आहे. आता कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र नागरिक खंबीरपणे कोरोनाशी लढा देत आहेत. नागरिकांनी आता संयम न पाळल्यास भविष्यात हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धुळे जिल्ह्यात प्रत्येक शंभर वर्षात साथींचा प्रादुर्भाव झाला आहे. 1720 साली स्पॅनिश फ्लूची साथ आली होती. त्यानंतर 1820 साली तत्कालीन खान्देशात कॉलराचा फेरा आला होता. 1920 साली प्लेगची साथ आली होती. आता 2020 मध्ये कोरोना विषाणूने धडक दिली आहे. तत्कालीन खान्देश आणि आताच्या धुळे जिल्ह्यात 1720 मध्ये किती धूळधाण उडाली होती, याची माहिती उपलब्ध नाही. तरी 1820 मध्ये आलेल्या कॉलराच्या साथीने तीन वर्षांच्या कालावधीत 11 हजार 521 लोकांचे प्राण घेतले होते. ही साथ 1817 ते 1820 दरम्यान हाहाकार माजवित होती. त्यानंतर 1901 मध्ये स्पॅनिश फ्लूने खान्देशात डोकेवर काढायला सुरुवात केली होती. त्यावेळी 323 जण मृत्यूमुखी पडले. परंतु शहरातील नागरिकांनी गावाबाहेर स्थलांतर केल्यामुळे पुढील हानी टळली.
साथीच्या आजाराने 1902 आणि 1903 या वर्षी धुळे शहरास भयंकर तडाखा दिला. 20 सप्टेंबर 1902 पर्यंत 117 जण मृत्यूमुखी पडले. सन 1903 मध्ये 2683 जणांचा बळी या साथीने घेतला. सन 1916 मध्ये या साथीने पुन्हा डोके वर काढले. त्यावेळी 713 जणांचा बळी या साथीच्या आजाराने घेतला. सन 1919 या साथीने बराच जोर धरला. मात्र नगरपालिकने आपली जबाबदारी व्यवस्थित संभाळल्याने या काळात साथीत कोणाचाही बळी गेला नाही. प्लेगला कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांना पकडण्यासाठी त्यावेळी धुळे पालिकेने 500 पिंजरे तयार करुन 19 हजार 510 उंदीर पकडून त्यांचा नाश केला होतो. आता 2020 मध्ये धुळ्यात कोरोनाने धडक दिली आहे. या भागातील खाद्य संस्कृती हे या भागात कोरोनाला बराच काळ दूर ठेवायचे एक कारण असू शकते असे जाणकारांना वाटते.