महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जलसंवर्धनाची सुरुवात ही आपल्या घरापासून करणे गरजेचे, धुळेकरांचे मत

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या 'संकल्प जलसंवर्धनाचा' या विशेष कार्यक्रमांतर्गत जलसंवर्धनासाठी कोण कोणत्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही धुळेकर नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मोगलाईचा राजा गणपती

By

Published : Sep 5, 2019, 10:48 AM IST

Updated : Sep 5, 2019, 11:30 AM IST

धुळे- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या 'संकल्प जलसंवर्धनाचा' या विशेष कार्यक्रमांतर्गत जलसंवर्धनासाठी कोण कोणत्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही धुळेकर नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

धुळेकरांचे मत जाऊन घेताना

संपूर्ण राज्यात पडलेला भीषण दुष्काळ पाहता यापुढील काळात जलसंवर्धनासाठी सगळ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. या संकल्पाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी. प्रत्येकाने आपल्या घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग केले पाहिजे, असे मत धुळे शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.


जलसंवर्धनाबाबत बोलताना धुळेकर नागरिकांनी सांगितले की, आज शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र, या उपायांची अंमलबजावणी होत नाही. जलसंवर्धनासाठी आज सगळ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे. यासारख्या उपक्रमातून जलसंवर्धन केले जाऊ शकते तसेच याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी, असे मत धुळेकर नागरिकांनी व्यक्त केले.

Last Updated : Sep 5, 2019, 11:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details