धुळे- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूला शहराप्रमाणेच धुळे तालुक्यातील विविध ग्रामीण भागातही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील रस्ते निर्मणुष्य झाले असून नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद देत कोरोना विषाणूविरुद्ध लढण्याचा निर्धार केला.
धुळे ग्रामीणचा जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद
कोरोना विषाणूबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. स्वच्छता राखण्यासह विविध उपाययोजना ग्रामीण भागात राबविण्यात आल्या आहेत. याला ग्रामीण भागातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे.
धुळे
कोरोना विषाणूबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. स्वच्छता राखण्यासह विविध उपाययोजना ग्रामीण भागात राबविण्यात आल्या आहेत. याला ग्रामीण भागातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. आज 'जनता कर्फ्यू' च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेशी 'ईटीव्ही भारत' ने संवाद साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा-कोरोना इफेक्ट : धुळ्यातील विवाह सोहळा; वधू-वरासोबत सर्वांनी मास्क लावत पार पडले विधी