महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'निजामुद्दीन मरकझ'चे धुळे कनेक्शन! दिल्लीतील 'त्या' कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिकांचाही समावेश - delhi markaz

दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील 15 नागरिक सहभागी झाल्याची माहिती, जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.

Bhausaheb hire Medical College and Hospital Dhule
भाऊसाहेब हिरे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धुळे

By

Published : Apr 2, 2020, 5:20 PM IST

धुळे - दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ या कार्यक्रमाचे धुळे जिल्ह्याशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी झालेल्या धार्मिक कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील काही मुस्लिम धर्मीय बांधव सहभागी झाले होते. जिल्ह्यातील तब्बल १५ नागरिकांचा यात समावेश असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या संशयितांचे अहवाल काय येतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. मात्र, या बातमीने धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात धुळ्यातील 15 नागरिक सहभागी...

हेही वाचा...COVID-19 : पंतप्रधानांचा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद..

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यातच दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्यात झालेल्या 'मरकझ' या धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरोनाबद्दल किती बेफिकिरी दाखवली जात आहे, हे समोर येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details