धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे बँकेतून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँकेबाहेर तोबा गर्दी केल्याचे बघावयास मिळत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बँकेबाहेर नागरिकांची तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - social distancing
धुळे जिल्हा रेडझोन घोषित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये बेजबाबदारपणे नागरिकांनी बँकेबाहेर गर्दी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच धुळे जिल्हा रेडझोन घोषित करण्यात आला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बेजबाबदारपणे नागरिकांनी बँकेबाहेर गर्दी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.