महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात गर्दी, सोशल डिस्टन्सचा फज्जा - People breaking rule of social distance

अक्षय्य तृतीया निमित्त खरेदी करण्यासाठी धुळे शहरातील बाजारपेठेत नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

people-breaking-rule-of-social-distance-on-the-occasion-of-akshay-trutiya-in-dhule
धुळ्यात अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात गर्दी, सोशल डिस्टन्सचा फज्जा

By

Published : Apr 26, 2020, 10:47 AM IST

Updated : Apr 26, 2020, 11:16 AM IST

धुळे -साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण संपूर्ण खानदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेला खानदेशात घागर भरण्याची पद्धत असून हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्त बाजारात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असतानाही नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सोशल डिस्टंस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अक्षय तृतीया असल्याने नागरिकांनी बाजारात वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टंसचा फज्जा उडवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Last Updated : Apr 26, 2020, 11:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details