धुळ्यातील पांझरा नदीला आलेला पूर गिरीश महाजनांच्या आदेशामुळे; अनिल गोटेंचा आरोप
पांझरा नदीला आलेला पूर हा मानवनिर्मित आहे, नैसर्गिक आपत्ती नाही, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या इशाऱ्यामुळे हे झाले असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
माजी आमदार अनिल गोटे
धुळे- पांझरा नदीला आलेला पूर हा मानवनिर्मित आहे, नैसर्गिक आपत्ती नाही. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशामुळेच हे झाले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पांझरा नदीवर आपण बांधलेल्या रस्त्याची दुरवस्था व्हावी, तसेच पुलावर उभारण्यात आलेली शंकराची मूर्ती पाण्यामुळे खाली पडावी, अशा दृष्ट हेतूने हे करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या आदेशामुळे हे झाले असल्याचा आरोप धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवले असल्याची माहिती गोटे यांनी दिली.