धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात विद्यमान रोजगार हमी, पर्यटन आणि अन्न औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांचे एकछत्री वर्चस्व राहिले आहे. २००९ पासून ते सातत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत रावल हे विजयाची हॅटट्रिक करतात की, आघाडी परिवर्तन घडवणार याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
हेही वाचा... आष्टी; राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यातच, मुलाच्या उमेदवारीसाठी धस कापणार का आमदार धोंडेंचे तिकीट?
शिंदखेडा हा मतदारसंघ जयकुमार रावल यांच्याच नावाने ओळखला जातो. २००९ पासून जयकुमार रावल हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यासोबत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ, माजी मंत्री आणि घरकुल घोटाळ्यातील आरोपी हेमंत देशमुख यांच्या नावानेही चर्चेत राहिला आहे. आघाडीच्या काळात हेमंत देशमुख यांची तर युतीच्या काळात जयकुमार रावल यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. मात्र मंत्रिपद मिळूनही या मतदारसंघातील काही प्रश्न सोडविण्यात हे दोघेही नेते अपयशी ठरल्याचे येथील सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत.
हेही वाचा...'शेवटच्या श्वासापर्यंत खेड्या-पाड्यातील लोकांची साथ देईन'
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात १६२ गावांचा समावेश होतो. २००९ मध्ये या मतदारसंघाची फेररचना झाली होती. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाची ओळख जयकुमार रावल यांनी पूर्णपणे पुसली आहे. आपल्या कार्यकाळात जयकुमार रावल यांनी या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला असून, नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी, सुलवाडे जामफळ सिंचन योजना देखील कार्यान्वित केली आहे.
हेही वाचा... कर्जत-जामखेड, पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता...