महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुर्धर आजाराला कंटाळून धुळ्यात एकाची आत्महत्या - दुर्धर आजार

बापूचंद दासनोर असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर धुळे शहरातील साई मानवता हॉस्पिटल याठिकाणी उपचार सुरू होते.

धुळे

By

Published : Aug 6, 2019, 3:26 PM IST

धुळे- दुर्धर आजाराच्या उपचारासाठी जवळ पैसे नसल्याने तसेच विविध बँकांच्या कर्जाला कंटाळून साक्री तालुक्यातील सातमाने येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. बापूचंद दासनोर असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर धुळे शहरातील साई मानवता हॉस्पिटल याठिकाणी उपचार सुरू होते.

दुर्धर आजाराला कंटाळून धुळ्यात एकाची आत्महत्या

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सातमाने येथील बापूचंद दासनोर (वय ४५) हे गेल्या अनेक दिवसांपासून एका दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर धुळे शहरातील साई मानवता हॉस्पिटल याठिकाणी उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री बापूचंद दासनोर हे हॉस्पिटलमधून अचानक निघून गेले. सकाळी त्यांचा मृतदेह शहरातील गोंदूर रोडवरील समादेशक कार्यालयाच्या आवारात आढळून आला. याठिकाणी असलेल्या जाहिरातीच्या फलकाजवळ सलाईनच्या नळीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आलं.

उपचारासाठी जवळ पैसे नसल्याने आणि त्यांच्यावर विविध बँकांचे कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. बापूचंद दासनोर यांच्या मृतदेहामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details