महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे पुन्हा 'गँगवार'ने हादरले, एकाचा खून - धुळे गुन्हे बातमी

मोहाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असेल्या एका हॉटेलात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या गँगवारमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

rahul
rahul

By

Published : Jul 18, 2020, 7:21 PM IST

धुळे - शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दोन गटांमध्ये पूर्व वैमनस्यातून वाद झाले होते. या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला आहे. या हाणामारीनंतर पुन्हा एकदा धुळे शहरात गॅंगवार सक्रिय झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्याजवळील मोहाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलवर दोन गटात धुमश्चक्री उडाली. लाठ्या. काठ्यांसह तलवारी व हत्यारांचा वापर झाला तर गावठी कट्ट्यातून गोळीबारही करण्यात आला. यात एक जण ठार झाला. राहुल माइंड, असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठार झालेल्या तरुणाच्या पार्थीव शरिर सध्या शवविच्छेदनासाठी शाससकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हल्ला कोणी व कशासाठी केला याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details