धुळे- शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला धकड दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
धुळ्यात ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
राजेंद्र भावसार (न्याहळोद) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भावसार हे अवधान औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र ऑइल मिलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते.
राजेंद्र भावसार (न्याहळोद) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भावसार हे अवधान औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र ऑइल मिलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. काम संपल्यानंतर भावसार दुचाकीने गावी परतत असताना कुंडाणे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकने दुचाकीला फरफटत नेले, त्यामुळे भावसार यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कुंडणे गावच्या ग्रामस्थांनी फाट्यावर महामार्ग रोखून रस्ता रोको केला. या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी गतिरोधक बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.