धुळे - जिल्ह्यातील शिरपूर शहरात घर अंगावर कोसळून झालेल्या अपघातात एका 38 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. तर एक 14 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथील रूग्णालात नेण्यात आले आले.
शिरपूरमध्ये घर अंगावर कोसळल्याने एका युवकाचा मृत्यू हेही वाचा... भाजप पदाधिकाऱ्याने जमावासह दोघांवर केला प्राणघातक हल्ला
शिरपूर शहरातील जनतानगर वसाहतीत मध्यरात्री अचानक घराचे छत कोसळले. त्यामुळे घरात झोपेलेल्या कुटुंबातील 4 सदस्यांच्या अंगावर छत कोसळले. त्यापैकी कुटुंबप्रमुख रविंद्र गोकुळ शेटे (38) यांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. तर ललित विजय शेटे (14) हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे नेण्यात आले आहे.
हेही वाचा... वंचितकडून आज 'महाराष्ट्र बंद'... मनमाड शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरपूर शहरातील जनतानगर येथे 45 वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या सर्वच घरांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तरी देखील प्रशासनाने या रहिवाशांना अद्याप कोणतीही नोटीस बजावलेली नाही. त्यामुळे या घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा आहे.