महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरत-नागपूर महामार्गावर तिहेरी अपघात, 1 ठार - police

तालुक्यातील सुरत-नागपूर महामार्गावरील अजंग गावाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात रिक्षाचा स्फोट झाला आहे. यात रिक्षाचालकाचा होरपळून मृत्यू झाला तर तीघे भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने

By

Published : Oct 2, 2019, 11:51 PM IST

धुळे- तालुक्यातील सुरत-नागपूर महामार्गावरील अजंग गावाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात आहे. यात रिक्षाचा स्फोट झाला असून या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला आहे. तर तीन जण भाजले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही.

अपघातग्रस्त वाहने

धुळे तालुक्यातील सुरत-नागपूर महामार्गावरील अजंग गावाजवळ बुधवारी सायंकाळी ट्रक, रिक्षा आणि ट्रॉली यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचा स्फोट झाला असून रिक्षाचालक जागीच ठार तर तीन जण भाजले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

हेही वाचा - धुळे: शिरपूर तालुका पोलिसांकडून 72 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

अपघाताची माहिती मिळताच अजंग ग्रामस्थांनी महामार्गाकडे धाव घेतली रिक्षाला लागलेली आग विझवण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होण्यास खूप उशीर झाला होता. आगीत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली असून रिक्षाचालकाचा आगीत अडकल्याने होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा - धुळे जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details