महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात ट्रक व आयशरची समोरासमोर धडक; १ जण जागीच ठार, एक जखमी - दोंडाईचा पोलीस न्यूज

दोंडाईचा विखरण रस्त्यावर धुळ्याकडून सुरतकडे जाणारी आयशर गाडी क्रमांक जीजे झिरो 3 ई डब्ल्यू 1976 आणि दोंडाईचाकडून मालवाहू ट्रक जात असताना विखरण गावाजवळ ट्रकचा टायर फुटल्याने समोरुन येणाऱ्या आयशर गाडीवर आदळला. या अपघातात आयशर चालक जागीच ठार झाला.

truck and eicher accident at dhule
ट्रक आणि आयशरचा अपघात

By

Published : Aug 8, 2020, 12:17 PM IST

धुळे-जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा विखरण रोडवर मालवाहतूक करणारी आयशर गाडी व ट्रक यांचा समोरासमोर अपघात झाला. अपघातात प्लायवूड वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीतील चालक जागीच ठार झाला आहे. ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झालेली आहे. उपचारासाठी त्याला दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातून धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

मालवाहतूक करणारी वाहने आंध्रप्रदेश व बिहार राज्यातील असल्यामुळे मृताची ओळख पटण्यास विलंब होत होता. विक्रम गावकर यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशनला कळवले असता घटनास्थळी दोंडाईचा पोलीस दाखल झाले. आयशर चालकाचा मृतदेह दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पारख यांनी सदर मृतदेहाची तपासणी केली.

दोंडाईचा विखरण रस्त्यावर धुळ्याकडून सुरतकडे जाणारी आयशर गाडी क्रमांक जीजे झिरो 3 ई डब्ल्यू 1976 आणि दोंडाईचाकडून मालवाहू ट्रक जात असताना विखरण गावाजवळ ट्रकचा टायर फुटल्याने समोरुन येणाऱ्या आयशर गाडीवर आदळला. दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाल्यामुळे आयशर गाडीचा चालक जितेंद्र भाई वाघेला बिहार हा जागीच ठार झाला. मालवाहू ट्रकमधील सुनील टेनपल्ली आंध्रप्रदेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता पायात मोठी दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले. मृत जितेंद्रभाई वाघेला याचा मृतदेह दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे.

घटनास्थळी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चंदू साळुंखे व मोरे यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक कोंडी दूर केली. दोंडाईचा पोलिसात अपघाताबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पुढील तपास दोंडाईचा पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details