धुळे - कोरोनासारख्या महामारीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून अनेक गोरगरीब कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. यामुळे आज लाखो नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज परिचारिका दिनाचे औचित्य साधत धुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर तसेच धान्य वाटप करण्यात आले.
परिचारिका दिनाला धुळे जिल्हा रुग्णालयात धान्य वाटप - Corona Dhule
परिचारिका दिनाचे औचित्य साधत धुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर तसेच धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ज्या गोरगरिबांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही, अशा सर्वांना याचा लाभ होईल.
![परिचारिका दिनाला धुळे जिल्हा रुग्णालयात धान्य वाटप परिचारिका दिन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11735135-365-11735135-1620829138447.jpg)
परिचारिका दिन
परिचारिका दिनाला धुळे जिल्हा रुग्णालयात धान्य वाटप याबाबत माहिती देताना संघटनेच्या अध्यक्षा अधिपरिचारिका प्रतिभा घोडके